Details: मालमत्ताचे (इमारती किंवा जमीन) सर्वेक्षण व माहिती गोळा करणे, मालमत्ताचे विश्लेषण आणि सर्वेक्षण केलेल्या मालमत्तेचे अहवाल तयार करण्यासाठी नगर पंचायतला सहकार्य करणे. प्रत्येक मालमत्तेचा स्केच डायग्राम व केस पेपर तयार करणे, न.पं. च्या रेकॉर्डशी जुळवणी करणे. दुहेरी आणि अज्ञात मालमत्तांची ओळख करण्यास न.पं. ला मदत करणे. महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ११२ व ११४ नुसार भांडवली मूल्य किंवा करयोग्य मूल्य पद्धतीनुसार मालमत्तेचे कर मूल्यांकन करून प्रारूप यादी तयार करण्या करिता न.पं. कर्मचारी यांना मदत करणे. महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ११९(सूचना नोटीस) वाटप करण्या करिता न.पं. कर्मचारी यांना मदत करणे. तसेच १२०(हरकतींवर सुनावणी),१५०(मागणी बिल) व १६९(अपील प्रक्रिया) अन्वये न.पं. ला मदत करणे. मालमत्ता कर विभाग करिता सर्वेक्षण अंतर्गत गोळा केलेल्या सर्वेक्षणाच्या नोंदीचे संगणकीकरण करण्यासाठी डेस्कटॉप सॉफ्टवेअर तयार करणे. मालमत्ता कराचे ऑनलाइन पेमेंट व रेकॉर्ड त्वरित शोधण्यासाठी ऑनलाइन पेमेंट सिस्टम उपलब्ध करून देणे.
Sector: Municipality